आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांनी माझा अपेक्षाभंग केला : अण्णा; तीन मंत्री अडकल्याने दु:ख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राळेगणसिद्धी- लोकपाल आंदोलनातून ज्यांचे नेतृत्व उदयास आले त्या केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील एकामागे एक तीन मंत्री विविध वादात सापडल्याने अण्णा हजारेंनी तीव्र दु:ख व्यक्त केले. केजरींनी अपेक्षाभंग केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माझ्यासोबत काम करताना केजरीवाल यांनी ग्राम स्वराज्यवर पुस्तक लिहिले होते. आता दिल्लीत जे सुरू आहे ते काय ग्राम स्वराज्य आहे?, असा प्रश्न अण्णांनी उपस्थित केला. केजरीवाल यांच्याकडून आता मला काहीही आशा राहिलेली नाही, असेही अण्णा म्हणाले. दरम्यान, अण्णांच्या या भावनेबद्दल दिल्लीत पत्रकारांनी केजरीवाल यांना छेडले असता त्यांनी टाळाटाळ केली. दिल्लीत सरकारमधील माजी मंत्री संदीप कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर अण्णांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अण्णा योग्यच -
आप :दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी अण्णांची नाराजी योग्यच असल्याचे म्हटले आहे. त्यांचा आम आदमी पार्टीबाबत आपलेपणा यात दिसून येताे, असे शिसोदिया म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...