आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व क्षेत्रांतील लोकांनी एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरुद्ध लढावे- अण्णा हजारे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- देशामध्ये भ्रष्टाचार वाढल्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे देशातील तरुण, समाजसेवक, साहित्यिक व सर्वच क्षेत्रांतील लोकांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.

कवी रघुनाथ आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘हे राज्य काळ्या इंग्रजांचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी चंद्रकांत पालवे होते. क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचे सरव्यवस्थापक सूर्यकांत आघारकर, पारनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चंद्रकांत भोसले यांच्यासह मेधा काळे, सुनील गोसावी, भगवान राऊत यावेळी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, चारित्र्यवान माणसांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, तरच खरी लोकशाही व खरे स्वातंत्र्य अस्तित्वात येईल. शाहीर भारत गाडेकर यांच्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन केले. सुनील धस यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुदर्शन धस यांनी आभार मानले.