आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान यंत्रांवरील पक्षांची चिन्हे काढा; अण्णा हजारेंची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर- निवडणुकांमध्ये पक्षांचे चिन्ह ठरलेले असते. मात्र, अपक्षांना उशिरा चिन्ह वाटप केले जाते. हा प्रकार समानतेला धोका देणारा आहे. मुळात निवडणुकाच घटनाबाह्य पद्धतीने लढवल्या जात असल्याने मतदान यंत्रावरील पक्षांची चिन्हे हद्दपार करावीत, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली. आयोगाने मतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो लावण्याच्या आमच्या मागणीची अंमलबजवाणी सुरू केली. पण चिन्ह काढून टाकण्याच्या मागणीचा आग्रह धरणार असून, यासाठी देशभरात जनजागृती करणार असल्याचे अण्णांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘भारतातील स्वतंत्र नागरिक लोकसभा, विधानसभेसह काेणत्याही निवडणुका लढवू शकतो, असे भारतीय राज्य घटनेत म्हटले आहे. कोणत्याही समूहाने किंवा पक्षाने एकत्र येऊन निवडणूक लढवावी असे त्यांनी म्हटलेले नाही. त्यामुळे सन १९५२ पासून झालेल्या निवडणुका घटनाबाह्य असून या पक्षांनी लोकशाहीला धोका दिला आहे. याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चाही केली. पक्षांची चिन्हे कोणत्या कायद्याने आरक्षित केली, या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तरच नव्हते’, असा दावा अण्णांनी केला.