आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांना पुन्हा जिवे मारण्याचे धमकीपत्र, 15 दिवस खा-प्या, 26 ला तुमचा गेम करू'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - "१५ दिवस अापण खा-प्या. २६ जानेवारी हा आपला शेवटचा दिवस आहे,’ अशा धमकीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आले आहे. "२६ नंतर तुमचा गेम करू', असे त्यात नमूद आहे.
हजारेंच्या राळेगण कार्यालयाला १२ जानेवारीला हे पत्र मिळाले. त्याच दिवशी पारनेर ठाण्यात तक्रार नोंद झाली. तथापि, अण्णांनी ते उघड करण्याचे टाळले होते. हे पत्र पोलिसांकडूनच व्हायरल झाले. "आपण पांढऱ्या कपड्यांत भरपूर पैसा कमावला, खूप उपभाेग घेतला. देवाकडे जाण्यास सज्ज व्हा. अण्णा आपण आपला वारस लवकर नेमावे, आम्ही नेवाशावाले आपले काम फत्ते करू,’ असे या पत्रात म्हटले आहे. पत्राखाली अंबादास लष्करे, नीलेश पिटेकर, पप्पू पवार, पांडे मिस्तरी, अमोल या नावांसह फोन नंबर अाहेत. मात्र, ती खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.