आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा हजारे यांचा जनतंत्र यात्रा दौरा रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - डोळ्यांचा आजार बळावल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा जनतंत्र यात्रेचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 23 जून ते 19 जुलैदरम्यान उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशात जनतंत्र यात्रेच्या चौथ्या व पाचव्या टप्प्या दरम्यान 57 ठिकाणी अण्णा जनतेशी संवाद साधणार होते.

या दौर्‍यासाठी हजारे बुधवारीच राळेगणसिद्घीहून रवाना झाले होते. पुण्यात डोळ्यांची तपासणी करून ते मुंबईमार्गे गुरुवारी उत्तरप्रदेशातील मुरादाबादला विमानाने पोहोचणार होते. बुधवारी सायंकाळी डोळ्यांची तपासणी केल्यानंतर हजारे यांना सक्तीच्या विर्शांतीचा सल्ला देण्यात आला. सुमारे वीस दिवसांच्या विर्शांतीनंतर त्यांच्या डोळ्यावर छोटी शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे.

मागील वर्षी हजारे यांच्या डोळ्यांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे देशभर दौरे सुरूच असून विर्शांतीअभावी त्यांच्या डोळ्यांचा आजार बळावल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हजारे वीस दिवस सक्तीची विर्शांती घेणार असून त्यानंतर शस्त्रक्रियाही करण्यात येईल. त्यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर जनतंत्र यात्रेच्या चौथ्या व पाचव्या टप्प्याच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी सांगितले. अण्णा सध्या राळेगणमध्ये आहेत.