आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासकीय कामकाज ऑनलाइन करावे - अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराला आळा घालून कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर जनतेशी संबंधित सर्व शासकीय कार्यालयांतील कामकाज ऑनलाइन करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी केली आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील जमीन बिगरशेती प्रक्रिया (एन ए) ऑनलाइन केली आह़े त्यामुळे सुमारे दीड हजार प्रकरणांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध झाली. शासकीय कार्यालयात खेटे न घालता जनतेला मोबाइलवर माहिती मिळत आह़े ऑनलाइन पद्धतीतून पुण्याने आदर्श निर्माण केला आहे. याच धर्तीवर शासनाने रेशनिंग, महसूल, जिल्हा परिषदांसह मंत्रालयांचे विविध विभाग व जनतेशी संबंधित सर्व शासकीय कामकाज ऑनलाइन करणे गरजेचे आह़े

ऑनलाइनचे फायदे
शासकीय विभागांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध झाल्यास जनतेला घरबसल्या कामाची प्रगती जाणून घेता येईल. त्यामुळे सरकारी कार्यालयांत होणारी गर्दी कमी होईल. नागरिकांच्या वेळेची बचत होईल. शिवाय भ्रष्टाचार थांबण्यास मदत होऊन जनतेला माहितीच्या अधिकाराच्या वापराची फारशी गरज भासणार नाही.