आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेड्यातील तिहेरी हत्याकांड जिल्ह्यासाठी कलंक, अण्णा हजारेंनी घेतली जाधव कुटुंबीयांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - मुख्यमंत्री व गृहमंत्री जवखेडे हत्याकांडाच्या तपासाबाबत विशेष लक्ष देत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह विविध यंत्रणा आरोपींच्या तपासकार्यात गुंतल्या असून या प्रकरणाचा तपास लवकरच लागेल, असा विश्वास व्यक्त करत नगर जिल्हा ही संतांची भूमी आहे. तिहेरी हत्याकांडाचा कलंक जिल्ह्याला लागणे दुर्दैवी आहे. अशा आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी सांगितले.

हजारे यांनी जवखेडे येथे भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. मृताच्या आई-वडिलांनी हजारे यांच्यापुढे कैफियत मांडली. तपास यंत्रणांनी आमच्याच घरातील काहींना चौकशीसाठी नेले. आरोपी मोकाट फिरत आहेत अन् निरपराध्यांना पोलिसांचा जाच होत आहे. आमचे नातू नार्को टेस्टसाठी नेले. त्यांना त्वरित आमच्याकडे सुपूर्द करा, असे ते म्हणाले. ग्रामस्थांच्या दृष्टिकोनाविषयीही त्यांनी तक्रार केली.

हजारे म्हणाले, राळेगण परिवाराने हत्याकांडाच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा काढला होता. हत्या करणाऱ्यांचा शोध अद्यापही लागला नाही. मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. माजी सरपंच चारुदत्त वाघ यांनी हजारे यांच्याशी गावातील जातीय सलोखा व सामाजिक शांतता याबाबत चर्चा केली. या वेळी राळेगणचे सरपंच जयसिंग मापारी, विलास औटी, सुरेश पठारे, महेंद्र गायकवाड, श्यामकुमार पठाडे, लाभेश औटी, भाऊ पोटघन, राजाराम गाजरे, दत्ता आवारी आदी उपस्थित होते.

सामाजिक तेढ नको
या घटनेने सामाजिक तेढ िनर्माण होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. सवर्णविरुद्ध दलित असे स्वरूप वादाला येऊ नये. पुढच्या काळात असे वातावरण निर्माण होणे धोकादायक ठरणार अाहे. सामाजिक सलाेखा निर्माण करावा, असे अण्णा म्हणाले.