आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा हजारेंच्या ‘स्कॉर्पिओ'चा रविवारी लिलाव, नवी इनोव्हा घेणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वापरलेल्या व गेल्या आठ वर्षांतील भ्रष्टाचारविरोधी चळवळीतील अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या स्कॉर्पिओचा रविवारी लिलाव करण्यात येणार आहे. ही गाडी जुनी झाल्याने लिलाव करण्यात येणार अाहे.

हजारे यांनी २००७ मध्ये स्कॉर्पिओ घेतली हाेती. ते राज्याच्या दौऱ्यावर असताना आैंढा नागनाथ येथील विश्रामगृहातून ही गाडी चोरीला गेली होती. तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रयत्न करूनही तपास लागला नाही. विमा उतरवलेला असल्याने महिंद्रा कंपनीने नवी गाडी (एमएच १६ एबी ९६९) ‍दिली. हजारे यांनी या गाडीतून सुमारे पावणेदोन लाख किलोमीटरचा प्रवास केला. २००७ व २००९ मधील भ्रष्ट मंत्र्यांवरील कारवाईसाठी झालेल्या, तसेच २०१० मधील पतसंस्थांमधील ठेवीच्या आंदोलनातही या गाडीतूनच हजारे यांनी प्रवास केली. २०११ ते २०१३ दरम्यान चारवेळा झालेल्या जनलोकपाल आंदोलनाच्या वेळीही अण्णांनी हीच गाडी वापरली हाेती. २०१२ मध्ये नागपूर येथे अण्णांची सभा सुरू असताना काहींनी या गाडीच्या काचा फोडल्या होत्या.

हजारे यांना पाठदुखीचा त्रास असल्याने प्रवासासाठी आरामदायी गाडी घेण्याची गळ कार्यकर्त्यांनी अण्णांना घातली. याला अण्णांचा विरोध होता. तथापि, आता या गाडीचा लिलाव करून ते नवी इनोव्हा घेणार असल्याचे समजते.