आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकपालसाठी अण्णा पुन्हा आंदोलन करणार, कर्नाटक दौ-यानंतर आंदोलनास सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जो राजकारणात जाईल, तो आंदोलनातून संपला, या न्यायाने अण्णांनी एकेकाळच्या आंदोलनातील सहकारी किरण बेदी यांच्या भाजप प्रवेशाकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यासाठी देश ढवळून काढणारे आंदोलन केले त्या लोकपालच्या नियुक्तीसाठी पुन्हा अण्णा आंदोलनाच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजले. हा धमाका त्यांच्या कर्नाटक दौ-यानंतर व राळेगणमध्येच होण्याची शक्यता आहे.

भाजप सरकारने मात्र लोकपाल व अण्णांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याचे ठरवल्यासारखी स्थिती असल्याने अण्णा अस्वस्थ आहेत. त्यामुळे सरकारला पुन्हा आठवण करून देण्यासाठी अण्णा पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.