आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनलोकपालसाठी अण्‍णांचे उपोषण सुरु, केजरीवालांना व्‍यासपीठावर \'नो एन्‍ट्री\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - जनलोकपालसाठी अण्णा मंगळवारपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्‍थळी हळूहळू गर्दी होऊ लागली आहे. अण्‍णांच्‍या उपोषणाला समर्थन देण्‍यासाठी देशभरातून समर्थक दाखल होऊ लागले आहेत. अण्‍णांच्‍या माजी सहकारी किरण बेदी याठिकाणी पोहोचण्‍याची शक्‍यता आहे. अण्‍णांच्‍या व्‍यासपीठावर कोणालाही बसण्‍याची परवानगी नाही. अण्‍णांना पाठींबा देणारे समोरच्‍या बाजूला मंडपातच बसतील. दुसरीकडे आम आदमी पार्टीकडून अण्‍णांना समर्थन देण्‍यासाठी कोण येणार, याबाबत उत्‍सुकता आहे. अरविंद केजरीवाल यांच्‍याबाबत विचारले असता ते म्‍हणाले, की उपोषण स्‍थळी कोणालाही येण्‍यास बंदी नाही. सर्वांसाठी दरवाजे उघडे आहेत.

अण्‍णांनी 'जनतंत्र मोर्चा' या नव्‍या नावाखाली उपोषण सुरु केले आहे. अण्‍णांनी उपोषणापूर्वी यादवबाबाचे दर्शन घेतले. त्‍यांची वैद्यकीय तपासणीही करण्‍यात आली. सध्‍या त्‍यांची प्रकृती उत्तम असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होईपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील. सरकारच्या कोणत्याही चर्चा किंवा आश्वासनावर आपला विश्वास नाही. राइट टू रिजेक्ट, राइट टू रिकॉल, ग्रामसभेला जादा अधिकार या कायद्यांसाठी व भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी आपला लढा सुरूच राहणार आहे, असेही ते म्हणाले. सरकार हिंसाविरोधी विधेयक आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, जनलोकपाल विधेयकाबाबत सरकार उदासीन आहे. हे विधेयक आणण्याची सरकारची इच्छाशक्ती नसल्याचे सांगत आता केवळ आश्वासन नाही, तर सरकारला विधेयक आणावेच लागेल. चार राज्यांच्या निवडणुकीत जनतेची फसवणूक केल्याने त्यांनी आपला संताप मतांच्या रूपात व्यक्त केला. विधेयक मंजूर झाले नाही, तर लोकसभा निवडणुकीत जनता पुन्हा सरकारला धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.
केजरीवालांनी आंदोलनाला बाहेरून पाठिंबा दिल्यास हरकत नाही... सविस्‍तर बातमी आणि उपोषणस्‍थळाची छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाईडमध्‍ये..