आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare Declines To Comment On Kejriwal Move To Form Govt

दिल्लीतील सत्तास्थापना, केजरीवालांवर अण्णांची ‘नो कॉमेंट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - लोकपाल विधेयकाच्या धर्तीवर लोकआयुक्त विधेयकाचा आदर्श मसुदा तयार करून सर्व राज्यांत सारखाच लोकआयुक्त कायदा लागू करावा, अशी मागणी ज्येष्ठ समजासेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली़ दरम्यान, अरविंद केजरीवाल दिल्लीत सत्ता स्थापन करीत असल्याबद्दल विचारले असता ‘नो कॉमेंट’ एवढेच उत्तर देत केजरीवाल यांच्याविषयी मी काहीही बोलणार नसल्याचे हजारे यांनी सांगितल़े

अण्णा म्हणाले, केंद्र सरकारने लोकपाल विधेयक मंजूर केल़े आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करताना त्यात काही त्रुटी राहता कामा नय़े या कायद्यासाठी चांगली नियमावली करणे गरजेचे आह़े चांगली नियमावली तयार करून त्याची योग्य अंमलबजावणी झाल्यास जनतेला या कायद्याचा फायदा होईल़ केंद्र सरकारने लोकपाल विधेयक मंजूर केले. आता त्याचे अनुकरण राज्यांनी केले पाहिज़े प्रत्येक राज्यात लोकआयुक्त कायदा अस्तित्वात यायला हवा. लोकपालच्या धर्तीवर आदर्श लोकआयुक्त विधेयकाचा मसुदा केंद्राने तयार करून तो प्रत्येक राज्याकडे पाठवावा व त्याची अंमलबजावणी त्या-त्या राज्याने करावी़ प्रत्येक राज्यात वेगवेगळा लोकआयुक्त कायदा अस्तित्वात आल्यास हा कायदा कमकुवत होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केल़े लोकपालमुळे सीबीआय तसेच केंद्रीय लाचलुचपत विभागावरील सरकारचे नियंत्रण संपुष्टात आल़े त्याच प्रमाणे राज्यातील लाचलुचपत विभागावरील राज्य सरकारचे नियंत्रण नष्ट करून हा विभाग लोकआयुक्ताच्या नियंत्रणाखाली आला पाहिजे, असेही हजारे यांनी सांगितल़े

दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने काँग्रेस वा भाजपचा पाठिंबा घेऊ नये. पाठिंबा असलेले सरकार पंगू असते असे मत हजारे यांनी यापूर्वी व्यक्त केले होत़े या पार्श्वभूमीवर सोमवारी केजरीवाल यांनी काँग्रेसच्या पाठींब्यावर सरकार स्थापनेचा निर्णय जाहीर केल्यानंतर हजारे यांनी या विषयावर बोलणे टाळून अप्रत्यक्षरित्या केजरीवाल यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली़.