आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली निवडणुकीमध्ये अण्णांच्या डुप्लिकेटचा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासारखा दिसणार्‍या एका व्यक्तीचा प्रचारात वापर केला जात असल्याच्या तक्रारी दिल्लीतील अण्णा हजारे समर्थकांकडून राळेगणसिद्धीत आल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने अण्णांसारख्या दिसणार्‍या व्यक्तीला प्रचारात उतरवले आहे. दिल्लीतील अण्णा समर्थकांनी राळेगणसिध्दीत काही फोटो पाठवले आहेत. केजरीवाल यांच्या या कृत्याविषयी त्यांनी अण्णांकडे नाराजी व्यक्त केली. "आप'ने असा अण्णांचा वापर थांबवावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

'ईव्हीएम मशीन्समध्ये बदल’
७ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढतच आहेत. भाजपच्या व्यंगचित्रात्मक जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात वाद होत आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या हितासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्समध्ये तांत्रिक बिघाड करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यासंबंधी केजरीवालांनी ट्विटरवर आपले मत जाहीर केले आहे. छावणी परिसरातील चार ईव्हीएम मशीन्सची काल तपासणी केल्याचे त्यांनी सांगितले.