आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनो, सेवाव्रत अंगीकारा : हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-मनुष्य जीवन सेवेशिवाय अर्थहीन आहे. प्रत्येकाने गावाचा, समाजाचा, देशाचा विचार करुन सेवा करावी. त्यातच खरा आनंद आहे. प्रत्येक माणसाचा जन्म सेवेसाठी झाला आहे. त्यामुळे तरुणांनी सेवाव्रत अंगीकारावे. तरुण जागा झाला, तर देश उभा राहील, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी सांगितले.
पेमराज सारडा महाविद्यालयात आयोजित विद्यापीठस्तरीय मूल्यशिक्षण कार्यशाळेत ‘युवा शक्ती हीच राष्ट्रभक्ती’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष वसंत लोढा होते. मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मुळे, डॉ. अनिल सहस्रबुद्धे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. पंडित शेळके, सुनील रामदासी, प्रकाश पोखरणा, अजित बोरा, शिरीष मोडक यांच्यासह स्वयंसेवक मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होते.
हजारे म्हणाले, आजचा तरुण सेवाव्रत झुगारुन व्यसनाधिन होत आहे. निर्व्यसनी राहून तरुणांनी राष्ट्रीय हिताला वेळ व महत्त्व द्यायला हवे. स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी ‘राष्ट्रनिर्माणाच्या प्रेरणा आणि दिशा’ या विषयावर यावेळी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक कार्यशाळेचे संयोजक डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी केले.