आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्ट उमेदवारांचे पुरावे जनतेने द्यावे : अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - छत्रपती शिवरायांचे नाव घेणार्‍या शिवसेनेने बबनराव घोलप (शिर्डी) व नावात राष्ट्रवाद असणार्‍या राष्ट्रवादीने पद्मसिंह पाटील (उस्मानाबाद) या भ्रष्टाचारात अडकलेल्यांना उमेदवारी का दिली, याचा जाब शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना पुरावे देऊन विचारू, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी सांगितले. भ्रष्ट उमेदवाराविषयी मतदारसंघातील जनतेने पुरावे संबंधित पक्षाच्या नेत्यांकडे व प्रसारमाध्यमांकडे द्यावेत, असे आवाहनही अण्णांनी केले.

पत्रकारांशी बोलताना अण्णा म्हणाले, घोलप व पद्मसिंहांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्याचे पुरावेही आपल्याकडे आहेत. असे असतानाही ठाकरे व पवार यांनी त्यांना उमेदवारी कशी दिली, असा प्रश्न आपण पत्र पाठवून विचारणार आहोत. सोबत दोघांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांना सादर करू. याकडे त्यांनी दुर्लक्ष केले, तर त्या मतदारसंघात रोज आपले कार्यकर्ते त्यांचे पुरावे जनतेसमोर जाऊन प्रसिद्ध करतील आणि अशा भ्रष्टांना संसदेत आपण पाठवणार का, असा प्रश्न विचारतील, असेही अण्णा म्हणाले.

ममतांच्या प्रश्नावर मौन
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली. संतोष भारतीय यांचा विषय संपल्याचे सांगत त्यांनी ममतांच्या प्रश्नावर मौन बाळगले.