आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर पद्मसिंह पाटील तुरुंगात गेलेच कसे : अण्णा हजारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देण्याची शरद पवारांची जुनीच प्रवृत्ती आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पद्मसिंह पाटील भ्रष्टाचारी आणि गुंड प्रवृत्तीचे नव्हते, तर ते दोन वेळा तुरुंगात गेलेच कसे, असा प्रश्न समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, संसदेत भ्रष्ट व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना रोखणे हे आपले कर्तव्यच आहे. फरक पडो न पडो, परंतु अशा प्रवृत्तींविरोधात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात जाऊन आपण जनजागृती करणार आहोत. दरम्यान, पुणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय बारवकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही हजारे यांनी केली.