आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापारनेर - माझ्या मतामध्ये संपूर्ण देश बदलण्याची शक्ती आह़े, हे लक्षात ठेवून समाज व देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून चारित्र्यशील उमेदवार निवडणे गरजेचे आह़े या देशात जो बदल घडवून आणायचा आहे, त्याची चावी तरुणांच्या हाती आह़े एकूण मतदानापैकी 50 टक्के मते तरुणांची आहेत़ त्यांनी हा देश बदलण्याचा विचार केला, तर ते अशक्य नाही, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशातील नवमतदारांना उद्देशून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, स्वातंत्र्यानंतरच्या 66 वर्षांत वाढलेला भ्रष्टाचार, लूट, गुंडगिरी, दहशतवाद, व्यभिचार यामुळे लोकसभेसारख्या पवित्र मंदिरात सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता हाच विचार करणारे लोक पोहोचले आहेत. समाज आणि देशाची सेवा करायला हवी, याचा विसर या लोकांना पडला आहे. दिवसेंदिवस राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा वाढत आहे. काहीही करून सत्तेत यायचे, यासाठी गुंड, भ्रष्ट, लुटारूंना तिकीट देण्यात येते. या निवडणुकीत कोट्यवधी नवमतदार प्रथमच मतदान करणार आहेत. त्यांच्या हातात परिवर्तन करण्याची शक्ती असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.
‘नोटा’च्या सक्षमीकरणासाठी आंदोलन
‘नोटा’ पर्याय सक्षम करण्यासाठी नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आंदोलन करावे लागेल. आंदोलनाशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. केवळ ‘नोटा’चा पर्याय देऊन चालणार नाही. जेवढे उमेदवार आहेत त्यापैकी ‘नोटा’च्या पर्यायास जास्त मते पडली, तर निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घ्यावी. फेरनिवडणुकीत पूर्वीच्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास मनाई करावी, अशी आमची भूमिका असल्याचे अण्णा म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.