आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare News In Marathi, Political Parties, Blog, Divya Marathi

राजकीय पक्षांविरोधात जनजागृतीसाठी अण्णा हजारेंची राष्ट्रीय संघटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - पक्ष व पार्ट्यांच्या विरोधात देशाच्या प्रत्येक राज्यात लोकशिक्षण, लोकजागृती व त्यातून लोकसंघटन उभे करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटना स्थापण्याची घोषणा अण्णा हजारे यांनी रविवारी ब्लॉगद्वारे केली़
अण्णा म्हणाले, 1952 पासून देशात आजपर्यंत घटनाबाह्य निवडणुका होत आहेत. देशाच्या घटनेत पक्ष आणि पार्ट्यांचे नाव नाही. पक्ष व राजकीय संघटनांच्या निवडणुकांमुळे संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर ताकदवान गट तयार झाले आहेत. आज लोकसभेमध्ये पक्ष आणि संघटनांचे उमेदवार निवडून गेल्यामुळे ती राजकीय पक्षांची सभा झाली आहे. ती लोकांची सभा राहिलेली नाही. त्यासाठी देशाच्या प्रत्येक राज्यात लोकजागृती करून राष्ट्रीय स्तरावर एक संघटना उभी करण्याचे काही लोकांनी एकत्र येऊन ठरवले आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर त्या संघटनेचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.
राजकीय पक्षांनी सत्ता आणि पैशांच्या अभिलाषेपायी भ्रष्टाचारी, गुंड, लुटारू उमेदवारांना उमेदवारी देऊन चूक केली असली, तरी ती चूक दुरुस्त करण्याची चावी मतदारांच्या हातात आहे, असे अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे.