आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare News In Marathi, Threatening Letter, Divya Marathi

हजारे यांना मिळणा-या धमक्यांची दखल घ्या,पृथ्‍वीराज चव्हाणांकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मागील काही दिवसांपासून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. ही गंभीर बाब असून हजारे यांच्या सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या केंद्र व राज्य योजना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, हजारे मागील 25 वर्षांपासून समाजातील भ्रष्ट प्रवृत्तींविरोधात लढत आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेते व धनदांडग्यांचे हितसंबंध दुखावले आहेत. काहींना तर सत्तेवरून बाजूला व्हावे लागले. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत हजारे यांना जिवे मारण्याच्या धमक्या फोन व पत्राद्वारे मिळत आहेत. ही गंभीर बाब असून काही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता शासनाने अण्णांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अण्णांच्या जिवाला धोका होणार नाही, याची शासनाने पुरेपूर काळजी घ्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, शहर व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना व व्यक्तींनीही हजारे यांना मिळालेल्या धमक्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून कारवाईची मागणी केली आहे.