आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anna Hazare News In Marathi, Toll Tax Maharashtra, Ralegan Siddhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार वर्षांपूर्वीच्या आश्वासनांचे काय झाले?; टोलप्रश्नी अण्णांचा सरकारला सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राळेगणसिद्धी- ‘सुरेश कुठे आहे? टोलच्या फायली काढायच्या होत्या ना.. दोन दिवसात माहिती गोळा करा’. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या स्वीय सहायकाशी साधलेला हा संवाद. ‘दिव्य मराठीने’ टोलविषयी विचारलेला प्रश्न पूर्ण होण्याच्या आत अण्णांनी या आदेशातून आपले उत्तर दिले. ‘जुन्या कागदपत्रांच्या आधारे, सलग आठ दिवस रोज एक मुद्दा मांडत सरकार कसे चूक आहे हे उघड करायचे आहे,’ अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
राज्यात टोलवरून वातावरण तापले असताना अण्णांनी त्यात उडी घेण्याचा मानस व्यक्त केला. अण्णांनी 2010 मध्ये आंदोलन केले होते. 4 वर्षे उलटूनही सरकारने वचने न पाळल्याने अण्णा संतप्त झाले आहेत. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले. टोल म्हणजे वाटमारी असून जनतेचा पैसा ठेकेदार व राजकारणी लुटत आहेत. सामान्य माणसाला कायदा हातात घेण्यास सरकारने भाग पाडले, असा घणाघात त्यांनी केला.

टोल आंदोलनाचा इतिहास
0अण्णांच्या नेतृत्वाखाली 2006 मध्ये पहिल्यांदा आंदोलन 02010 मध्ये लवासा आणि टोलचा मुद्दा पुन्हा पेटला 031 टोल बंद करण्यात आले. मागण्या मान्य करण्यात आल्या. 0 2013 कोल्हापुरात आंदोलन पेटले 0महायुतीने घेतली उडी, पाठोपाठ मनसेचा रास्ता रोको 0आता अण्णा पुन्हा मैदानात

2010 मध्ये अण्णांच्या आंदोलनानंतर या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.
मान्य झालेल्या मागण्या
0 ठेकेदाराचे नाव, खर्च ही माहिती फलकावर लावावी
0 पारदर्शकता आणून अधिक रकमेचा ठेका बंद करावा.
0 प्रत्येक पावती फाटल्यानंतर फलकावर हिशेब दिसावा.
0 खर्च वसूल होताच टोल बंद करावा
0 स्वच्छतागृह, स्वयंचलित पावती यंत्रणा बसवणे बंधनकारक
0 ठेकेदाराने नियमित डागडुजी करणे बंधनकारक

टोलची गरज नाही
पेट्रोल, डिझेलचा व्हॅट, रोड टॅक्समधून सरकारला 33 हजार कोटी रुपये मिळतात. 2250 कोटी रस्त्यांवर खर्च होतात. त्यामुळे टोलची गरज नाही. हे एक भ्रष्टाचाराचे साधन आहे. टोल पूर्णत: बंद करण्याची गरज आहे.
- प्रमोद मोहोळे, टोल अभ्यासक