आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णा हजारे आज दिल्लीत करणार अांदोलनाची घोषणा, लोकपालसाठी पुन्हा एकदा होणार एल्गार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सोमवारी (२ ऑक्टोबर) सकाळी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नवी दिल्लीत आंदोलनाची घोषणा करणार आहेत. राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन ते दर्शन घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल व स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने ते आंदोलनाची घोषणा करणार आहेत़. 
 
हजारे तीन वर्षांपासून पंतप्रधान मोदींना सातत्याने पत्र पाठवून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, अशी मागणी करत आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याचे त्रोटक उत्तर देण्यात येते. पंतप्रधान मोदी यांचे भाषण वेगळे कृती वेगळी, अशी टीकाही अण्णांनी केली असून पंतप्रधान मोदी यांना देशातील गैरप्रकार थांबवायचेच नाहीत असा अर्थ यातून निघत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. लोकपाल शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, अशी मागणी करत अण्णा थेट दिल्लीतूनच आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत. या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
बातम्या आणखी आहेत...