आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेड प्लस सुरक्षेस अण्णा हजारेंचा नकार, राष्ट्रहितासाठी काम सुरूच ठेवण्याचा निर्धार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - धमक्यामला नवीन नाहीत. मला मारुन समाधान मिळत असेल, तर जरुर मारा. मी मरणाला घाबरत नाही. समाज, राष्ट्रहितासाठी मी काम सुरूच ठेवणार अाहे, असे नमूद करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे.

हजारेंना गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी धमकीचे पत्र आल्यानंतर त्यांचे सहायक दत्ता आवारी, श्याम पठाडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. शुक्रवारी सकाळी राज्य सरकारने हजारे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. दुपारी अण्णांना मुख्यमंत्र्यांचा फोन आला. अण्णांनी झेड सुरक्षा स्वीकारावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

अशा धमक्यांना मी घाबरत नाही. आता माझ्या सुरक्षेवर खर्च करू नका, असे हजारे यांनी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांसह पारनेरचे पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी अण्णांच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. सायंकाळी सहानंतर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल झावरे यांच्यासह जालना, बीड राज्यभरातून आलेल्या अभ्यागतांशी अण्णांनी चर्चा केली. यावेळी झावरे सर्वांनीच अण्णांनी सुरक्षा घ्यावी अशी विनंती केली.
दरम्यान, धमकीचे पत्र पाठवणाऱ्याचे नाव महादेव संभाजी पांचाळ (दिंडेगाव, जि. लातूर) असे अाहे. धमकी देणाऱ्याने प्रथमच नाव, पत्ता फोटोही पाठवला आहे. हे पत्र उस्मानाबादमध्ये पोस्टात टाकले होते.