आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रदानामुळे नगरची ओळख राष्ट्रीय स्तरावर : हजारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरसारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर नेत्रदान होते. नेत्रदानामुळे नगरची ओळख राष्ट्रीय स्तरावर होत आहे, हे अिभमानास्पद आहे, असे गौरवोद््गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले. येथील आयएमए सभागृहात नेत्रदान केलेल्या कुटुंबीयांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. कुरेश मस्कती यांना ऑनर ऑफ व्हिजन अवॉर्ड हा विशेष पुरस्कार हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हजारे म्हणाले, नेत्रदान हे पुण्याचे कार्य आहे. मानकन्हैया नेत्रपेढीने आपल्या कर्तृत्वाने मोठे काम केले आहे. मीदेखील नेत्रदानाचा संकल्प साईसूर्य नेत्रसेवा येथे सर्वांच्या साक्षीने करत आहे, असे हजारे यांनी या वेळी जाहीर केले. या वेळी समाजोपयोगी संशोधनाबद्दल डॉ. वर्धमान कांकरिया यांना हजारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.