आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare Talk On Threatens Letter With 'same Fate As Dabholkar'

स्वकीयांचे मुडदे पाडून क्रांती अशक्य - अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्गानेच क्रांती करावी लागेल. स्वकीयांचे मुडदे पाडून सशस्त्र क्रांती होणार नाही, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी राळेगणसिद्धी येथे व्यक्त केले.

‘देशात लष्करी राजवट लागू करण्याची मागणी करा, नाहीतर तुमचाही नरेंद्र दाभोलकर करू,’ अशा आशयाचे धमकीपत्र अण्णांच्या कार्यालयात आले होते. अमेरिकेहून शनिवारी अण्णा परतले. त्यानंतर त्यांनी पत्रावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी मरणाला घाबरत नाही. सुपारी देऊन मारण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले, याची आठवणही त्यांनी दिली.

पोलिस अधीक्षकांकडून सुरक्षेचा आढावा : जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी राळेगणसिद्धीत येऊन अण्णांची भेट घेतली. सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. धमकीपत्र पाठवणार्‍यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी पारनेरचे निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांना दिले.