आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपातील विद्यार्थ्यांशी अण्णा हजारे यांनी साधला संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारबाहेर राहून सरकारवर दबाव आणण्यासाठी गट निर्माण करण्याचा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी युरोप खंडातील वेगवेगळ्या देशांतील विद्यार्थ्यांना दिला.

भ्रष्टाचारमुक्त देश व ग्रामविकास याविषयी अण्णांचे मार्गदर्शन घेण्यासाठी युरोप खंडातील कॅनडा, इंग्लंड, स्पेन यासह इतर देशांतील विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधींनी राळेगणसिद्धीला भेट दिली. गावांतील विकासकामे पाहून प्रभावित झाल्यानंतर या प्रतिनिधींनी हजारे यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारवर दबावगट निर्माण करण्याचा सल्ला देत हजारे म्हणाले, याविषयी जन आंदोलन उभे राहिल्यास सरकर जनतेच्या मागण्या व अटी पूर्ण करील. भारत देशात सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणल्यामुळेच जनलोकपाल विधेयक मंजूर झाल्याचेही हजारे यांनी यावेळी सांगितले.

ग्रामविकासासाठी चळवळ उभी राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगत युवकांनी गावच्या विकासासाठी योगदान दिल्यास त्याचे रुपांतर चळवळीत होऊन ग्रामविकास साधला जाईल. युरोप खंडात युवकांनी अशी चळवळ उभी करावी, अशी अपेक्षाही अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केली.