आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनाधीनता वाढीस लागल्याने अत्याचारांत वाढ, अण्णा हजारे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुलींना धाडसी बनवणे गरजेचे आहे. त्यांच्यातील भीती काढली पाहिजे. व्यसनाधीनतेमुळे महिला, मुलींवर अत्याचार होतात हे कोपर्डीतील घटनेवरून लक्षात येते. त्यामुळे दारूबंदी होणे गरजेचे आहे. लवकरच हा अधिकार जनतेच्या हातात येणार आहे. पोलिस दारूबंदी करू शकत नाहीत, हे स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत पाहायला मिळाले. त्यांनी दारूबंदी केली असती, तर नगरमध्ये तेरा जण दगावले नसते. पोलिसांना सगळे माहिती असते. मात्र, हितसंबंध अाडवे येतात, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. 
 
प्रेरणा महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त सिंधू मंगल कार्यालयात आयोजित प्रेरणा पुरस्कार निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करताना हजारे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी अनिल कवडे, महापौर सुरेखा कदम, नगरसेवक अनिल बोरुडे, स्नेहांकुरच्या संचालिका प्राजक्ता कुलकर्णी, आर जे प्रसन्न पाठक, मंडळाच्या अध्यक्ष आश्लेषा भांडारकर, सचिव डॉ. मनीषा पुंड, पुष्पा बोरुडे, डॉ. शरद ठुबे उपस्थित होते. 
 
अांतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांना प्रेरणा पुरस्काराने, तर निबंध स्पर्धेत विजयी झालेल्या संगमनेर येथील संजया गोर्डे (प्रथम), श्रीरामपूर येथील संगीता फासाटे (द्वितीय), नगरच्या लता म्हस्के (तृतीय) अस्मिता शूळ वैशाली शिर्के यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरवण्यात आले. निबंध स्पर्धेसाठी ‘कसा घडवाल आजचा शिवबा’ असा विषय होता. परीक्षण सुरेश मैड प्रा. अनघा अत्रे यांनी केले. 
 
या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी डॉ. जयश्री कर्पे, डॉ. अपर्णा बकाल, मनीषा उबाळे, अर्चना येवले, स्नेहल बंड, विजयलक्ष्मी मंगलाराम, वीणा अहिरे, लता पानसरे, मुक्ता फलके, ज्योती दांडगे, शिल्पा जवळे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अस्मिता शूळ यांनी केले. आभार स्नेहल बंड यांनी मानले. या कार्यक्रमास जागतिक कीर्तीच्या कुस्तीपटू अंजली देवकर-वल्लाकट्टी, तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
 
बातम्या आणखी आहेत...