आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare Threatans Calls, Agitation At Village

अण्णांना मिळणार्‍या धमक्यांचा निषेध: राळेगणसिद्धीत उद्या ग्रामस्थांचे उपोषण व कडकडीत बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना येत असलेल्या धमक्यांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (9 मे) गाव बंद ठेवून लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. हजारे यांना वारंवार येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत मंगळवारी (6 मे) रात्री ग्रामसभा झाली. अध्यक्षस्थानी सरपंच जयसिंग मापारी होत़े सुरेश पठारे, लाभेश औटी यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. हजारे यांना येणार्‍या धमक्यांचा ग्रामस्थांनी निषेध केला़ शुक्रवारी (9 मे) गाव बंद ठेवून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनी खर्डा येथील दलित युवकाच्या हत्येसंबंधी हजारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचाही यावेळी निषेध करण्यात आला़
बेजबाबदार वक्तव्य करून दिशाभूल नको- राळेगणसिद्धीतील दलितांसाठी हजारे यांनी काय केले हे राऊत यांनी येऊन पहावे. बेजबाबदार वक्तव्य करून लोकांची दिशाभूल व समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करू नये, अशा शब्दांत राळेगणसिद्धी येथील उत्कर्ष मंडळाचे कार्यकर्ते महेंद्र गायकवाड व शांताराम जाधव या दलित कार्यकर्त्यांनी राऊत यांचा निषेध केला. राळेगणसिद्धीत गेली 35 वर्षे दलितांच्या बैलांना बैलपोळ्याचा मान देण्यात येतो़ सामुदायिक विवाह सोहळे, दलितांच्या शेतीवरील कर्जाची र्शमदानातून फेड असे अनेक आदर्श राळेगणसिद्धीने हजारे यांच्या नेतृत्वाखाली घालून दिले आह़े, असे शांताराम जाधव यांनी यावेळी सांगितले.