आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare 'threatened' For Taking On NCP Candidate

धमक्यांना घाबरत नाही, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बेधडक प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर (जि. नगर) - ‘आतापर्यंत अनेकदा धमक्या आल्या, मात्र अशा धमक्यांना मी कधीच भीक घालत नाही. जनतेसाठी मी माझा जीव हातात घेऊन फिरतो आह़े समाज, देशासाठी मरण आले, तर ते मी माझे भाग्य समजेन’, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

उस्मानाबादेतील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात पत्रके वाटल्याच्या रागातून काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने हजारे यांच्या कार्यालयात दोनदा फोन करून धमकी दिली होती़ पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली असता, त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे कबूल केले. त्यानंतर पुन्हा उस्मानाबादेतूनच हजारे यांना धमकी पत्र मिळाले होते. ‘डॉ. पाटील पराभूत झाल्यास तुमचा ‘पवनराजे’ करू’, असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्याबाबत अण्णा म्हणाले की, ‘गेल्या 25 वर्षांपासून मी भ्रष्टाचाराविरुद्घ लढत आहे. मात्र काही लोकांना मात्र ते नको आहे. शरद पवारांचे नातेवाईक पद्मसिंहांना मी त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्घ बोलू नये, असे वाटत़े न्यायमूर्ती पी. बी. सावंत आयोगाच्या अहवालात पाटील हे दोषी असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्याविषयी जनतेला सांगितले पाहिजे. पाटील हे स्वत:साठी विचार करतात, तर मी लोकांसाठी विचार करतो़,’ असेही हजारे यांनी स्पष्ट केले.
‘कितीही सुरक्षा दिली तरी मारणारे कधीही मारतील’

धमकी पत्रासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या लेटरहेडचा गैरवापर झाला असावा का? या प्रश्नावर अण्णा म्हणाले, गोरे हे पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. शिवाय खासदारांना पत्रव्यवहारासाठी देण्यात आलेल्या पाकिटातूनच हे पत्र आले आहे. याचा विचार करावा लागेल. तुमच्या सुरक्षेत वाढ केली पाहिजे का असे विचारले असता अण्णा म्हणाले, कितीही सुरक्षा असली, तरी मारणारे कधीही मारू शकतात़ देशासाठी आजवर हजारो बलिदाने झाली. माझ्या रूपाने आणखी एक झाले, तर बिघडले कुठे?, असा प्रतिप्रश्न अण्णा हजारे यांनी या वेळी उपस्थित केला़.
देशासाठी मरण हे भाग्यच
समाज व देशाची सेवा करण्याचे व्रत मी माझ्या जीवनात हाती घेतले आहे. समाज व देशाची सेवा करताना अशा धमक्या आल्या, तर मी त्यास का भीक घालू? मी मरणाची तयारी ठेवली आहे. देश व समाजासाठी मरण आले, तर ते मी माझे भाग्य समजेऩ माझा मृत्यू कधीच मरण पावला आहे. त्यामुळे मला कशाचीही भीती वाटत नाही.’’ अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक