आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भ्रष्टाचार निर्मूलन’ राहणारच, आयुक्तांच्या विरोधात दाद मागू - अण्णा हजारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - स्वयंसेवी संस्थेच्या नावातून ‘भ्रष्टाचार’ शब्द वगळून उपयोग होणार नाही, तर गैरप्रकार करणार्‍या संस्थांना चाप लावण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे, मत ज्येष्ठ समाजसेवक व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संस्थेचे प्रमुख अण्णा हजारे यांनी गुरुवारी व्यक्त केले. आपल्या संस्थेच्या नावातील ‘भ्रष्टाचार’ हा शब्द काढण्याबाबत धर्मादाय आयुक्तांची नोटीस अजून मिळाली नाही, मात्र या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे ते म्हणाले.

भ्रष्टाचार निर्मूलन, अ‍ॅन्टी करप्शन नाव वापरून ब्लॅकमेल करणार्‍या संस्थांना चाप लावण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी संस्थांच्या नावातील ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ हे शब्द वगळण्यासाठी संस्थांना नोटिसा बजावल्या. या पार्श्वभूमीवर हजारे यांनी पत्रकारांसमोर भूमिका विषद केली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या कायद्याचा चांगला उपयोग झाला. संघटनेच्या नावातून भ्रष्टाचार निर्मूलन हे नाव काढून टाकणे अन्यायकारक आहे. भ्रष्टाचार हे नाव कमी करण्यापेक्षा संस्थांना कठोर अटी घालून त्याची अंमलबजावणी केली गेली पाहिजे.

अण्णांना धमकीपत्र : अण्णा हजारे यांना पुन्हा धमकीचे पत्र आले आहे. भूसंपादन विधेयकाला विरोध केल्यास संपवून टाकू, अशी धमकी त्यात दिली आहे. संजय घाेलप असे पत्रावर नाव असून ताे स्वत:ला भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगताे. या पत्रावर नगर जिल्ह्यातील राहता येथील पत्ता आहे.
बातम्या आणखी आहेत...