आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राळेगणसिद्धीचा विकास घडवणाऱ्या अण्णा हजारेंचा सत्कार, गावातील विकासकामांची पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आपल्या सर्वस्वाचे दान करून, रात्रंदिवस राबून राळेगणसिद्धीचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास घडवणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या भिंगार शाखेतर्फे शहराध्यक्ष अमित खामकर यांनी रविवारी सत्कार केला.

सत्कार समारंभानंतर बोलताना समता परिषदेचे भिंगार शहराध्यक्ष खामकर म्हणाले, जनलोकपाल विधेयकासाठी अवघ्या पाच दिवसांत दिल्ली सरकारला झुकवणारे अण्णा हजारे यांनी विकसित केलेल्या राळेगणसिद्धी गावाचा समावेश आता महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांमध्ये झाला आहे. महात्मा गांधींच्या स्वप्नातील आदर्श गावासारख्या अनेक लोकोपयोगी योजना अण्णांनी राळेगणसिद्धीत अमलात आणल्या आहेत. त्यामुळे हे गाव स्वयंपूर्ण विकासाचे आदर्श बनले आहे.

अण्णा यांच्या देशव्यापी आंदोलनानंतर ‘राळेगणसिद्धी’ हे गाव आता शक्तिस्थळ झाले आहे. देशभरातील विविध संघटनांनी हे गाव व्यापून टाकले आहे. महात्मा गांधी यांनी आंदोलनाची सुरुवात गुजरातमधील साबरमतीनंतर वर्ध्यामधील ‘बापू कुटी’ येथून केली, त्याची आठवण राळेगणसिद्धीला भेट दिल्यानंतर आली. मात्र, त्या वेळी ‘हायफाय’ संस्कृती नव्हती. राळेगणसिद्धीतील रस्ते, कचराकुंड्या सरकारी खर्चाने होऊ लागले. राळेगणसिद्धी हे गाव देशाच्या पातळीवर एक मोठे शक्तिस्थळ होऊ पाहत आहे.

अण्णांच्या या सत्कारावेळी भिंगार अर्बन बँकेचे सरव्यवस्थापक पांडुरंग हजारे, पोस्टल संघटनेेचे सचिव संतोष यादव, भिंगार येथीलपियूष डिजिटलचे संचालक उद्धव शिंदे उपस्थित होते.
दरम्यान, समता परिषदेच्या सदस्यांनी राळेगणसिद्धी येथील मीडिया सेंटर, हिंद स्वराज्य ट्रस्ट, पद्मावती मंिदर, कृषी अिधकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कार्यशाळेची आिण वििवध कामांची चेकडॅमची पाहणी केली.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा सत्कार करताना अमित खामकर. समवेत भिंगार अर्बन बँकेचे सरव्यवस्थापक पांडुरंग हजारे, पोस्टल संघटनेचे सचिव संतोष यादव. छाया: उद्धव शिंदे.
आरटीए विद्यापीठ झाल्यास नवल नाही

राळेगणसिद्धीहे उद्या देशातील मोठ्या पर्यटनस्थळाबरोबर माहिती अिधकार (आरटीए) विद्यापीठ झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. माहितीच्या अधिकारामुळे आरटीए कार्यकर्त्यांना अण्णांचे मोठे पाठबळ मिळाले. पारनेर तालुक्यातील हे गाव अण्णांमुळे जगाच्या प्रकाशावर आले आहे, असे खामकर यांनी सांगितले.येथील विकासकामे पाहून मन भारावून जाते. गावातील सर्व सण उत्सव ग्रामस्थ गुण्यागोविंदाने साजरे करतात. यातून गावाची एकजूट दिसून येते.