आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच कर्मचारी लोकपाल कक्षेत घेण्यास सहमती; पंतप्रधानांचे अण्णांना पत्र

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सर्व श्रेणींतील कर्मचारी लोकपालच्या कक्षेत घेण्याबाबत पंतप्रधानांनी सहमती दर्शवली आहे, तसे पत्रही त्यांनी मला पाठवले आहे. तसेच राइट टू रिजेक्टसाठीदेखील पंतप्रधानांनी तयारी दर्शवली असून त्याबाबत विरोधी पक्षांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. न्यू लॉ कॉलेज येथे ‘युवकांची राष्ट्रबांधणीत भूमिका’ या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, प्राचार्य ए. एस. राजू, विश्वस्त सीताराम खिलारी, शाहीर गायकवाड, बाबा गायकवाड आदी उपस्थित होते. अण्णा म्हणाले, नवा भारत घडवताना आपल्याला विकासदेखील करायचा आहे. सध्याचा विकास हा निसर्ग व मानवाचे शोषण करणारा आहे.

राहुल यांनी करून दाखवावे : राहुल गांधी जे बोलले ते सगळे चांगले आहे, त्यांचं भाषणही मला आवडलं; पण ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ गांधी जे बोलले ते प्रत्यक्षात करून दाखवणे खूप अवघड आहे. राहुल गांधींनी ते करून दाखवावे तरच मी त्यांना मानेल, असे अण्णांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.