आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांनी नाकारले ‘आप’चे निमंत्रण,प्रकृतीच्या कारणामुळे घेतला न जाण्याचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - दिल्लीत शनिवारी होणा-या आम आदमी पार्टीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिले; परंतु प्रकृतीच्या कारणास्तव आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे हजारे यांनी केजरीवाल यांना कळवले.
काँग्रेसच्या मदतीने ‘आप’चे सरकार दिल्लीत स्थापन होण्याचे निश्चित झाल्यापासूनच या शपथविधी सोहळ्याला हजारे उपस्थित राहणार का, याविषयी उत्सुकता होती. यासंदर्भात शुक्रवारी केजरीवाल यांनी हजारे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. प्रकृतीची विचारपूस करून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांनी अण्णांना दिले. मात्र, नुकतेच झालेले उपोषण व शस्त्रक्रिया यामुळे प्रवास करणे शक्य नसल्याने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही, असेही हजारे यांनी केजरीवाल यांना सांगितले. त्यामुळे अण्णा शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत.