आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागील 17 वर्षांपासून शनिशिंगणापुरात विशाल भंडारा अन्नदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे फाटा- भारतीय संस्कृतीत अन्नदान पवित्र मानले जाते. दर शनिअमवस्येला शनिशिंगणापुरातील यात्रोत्सवात अन्नदान करणाऱ्यांचे हात राबत असतात. दिल्ली, हरियाणा मुंबई येथील भाविकांकडून केल्या जाणाऱ्या अन्नदानाचा लाभ लाखो शनिभक्तांना होतो. भंडारादानात सर्वाधिक संख्या आहे हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील शनिभक्तांची. 

गेल्या १७ वर्षांपासून शनिशिंगणापुरात हा विशाल भंडारा अन्नदान करत आहे. शनिमंदिर सेवा मंडळ, मंडी डबवाली, हरियाणा, शनिदेव सेवा समिती ऐलनाबाद, सिरसा हरियाणा, शनिदेव सेवा सदन हरियाणा, दिल्लीवाले ग्रूप नवकार चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई हे दरशनिअमवस्येला विशाल भंडारा देणारी शनिभक्तांची मंडळे आहेत. त्यात शेतकरी, शेतमजूर विविध व्यावसायिकांचा समावेश आहेत. 


शनिमंदिर परिसरात मुख्य मार्गालगत मंडप टाकून हे अन्नछत्र चालवले जाते. शनिदेव सेवा मंडळ गेली १७ वर्षांपासून, शनिमंदिर सेवा मंडळ १० वर्षांपासून, दिल्लीवाले ग्रूप १० वर्षांपासून, ऐलनाबादची सेवा समिती १६ वर्षांपासून, तर मुंबईतील ट्रस्ट गेल्या १० वर्षांपासून दर शनिअमावस्येला शिंगणापुरात अन्नदान करत आहे. जगभरातून आलेले भाविक या विशाल भंडारा प्रसादाचा लाभ घेत असतात. हा महाप्रसाद स्वच्छ आरोग्यदायी कसा राहील, याचीही काळजी अन्नदान करणारी ही मंडळे घेत असतात. 


अन्नदान करण्यासाठी स्वयंपाकी, वाढपे, भाजीपाला, गॅस शेगड्या, विजेसाठी जनरेटर, मंडप, सामान हे सर्व मंडळ आपापल्या ठिकाणांहून येथे आणत असतात. शनिदेवाची सेवा म्हणूक घरची कुटंुबेही या कामात मदत करतात. ही मंडळे महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांना मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून आग्रह करतात. मंडळातील प्रमुखापासून सर्व सदस्य अन्नदानप्रसंगी श्रमदान करत असतात. पिण्याच्या पाण्याची मागणी केली, तर शिंगणापूर देवस्थानच्या वतीने टँकर पुरवला जातो. मात्र, बहुतेक मंडळे जारचेच पाणी वापरतात. प्रत्येकी मंडळात २५ ते ३० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. कोल्हापूरस्थित हरियाणातील सिरसा येथील शनिभक्त समितीने शनिशिंगणापुरात जागा घेऊन धर्मशाळा बांधण्याचा निर्णय घेत नियोजित जागेचे भूमिपूजन केले. शिंगणापूर देवस्थानच्या भक्तनिवासस्थानातील बारा खोल्या बांधण्यासाठीही या समितीने आर्थिक मदत केली. 


गरिबांपासून श्रीमंतांची अन्नदानासाठी मदत 
हरियाणातीलसिरसा जिल्ह्यातील चकेरिया येथील चेतराम लक्खाराम भट्टी हे श्रीशनिदेव सेवा समितीचे प्रमुख आहेत. अन्नदानाच्या माध्यमातून शनिदेवाची सेवा करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. या अन्नदानाकरिता गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व घटकांतील लोक मदत करत असल्याचे शनिदेव सिरसा समितीचे प्रमुख पवन बन्सल यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...