आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार? चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - श्रीगोंदे तालुक्यातील चोराची वाडी येथील एका अल्पवयीन आदिवासी मुलीचे श्रीगोंदे शहरातून सोमवारी भरदिवसा अपहरण करण्यात आले. ही मुलगी सोमवारी पांढरीपूल येथे आढळली. तिच्या हातावर इंजेक्शनच्या खुणा आहेत. तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी चार अज्ञात तरुणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी काहीच बोलत नसल्याने पोलिस तपासाबाबत चाचपडत आहेत.

कोपर्डी, तसेच शनिवारचे राहुरी येथील मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण गाजत असतानाच श्रीगोंद्यात हे प्रकरण घडल्याने खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचे वय १३ ते १४ दरम्यान आहे. ती सरस्वती नदीकाठच्या एका शाळेत शिकत होती. सोमवारी ती शाळेत जाण्यास निघाली. नदीकाठच्या बायपास रोडने जात असताना पाठीमागून काळ्या रंगाची स्कॉर्पिओ येऊन थांबली. त्यातील एकाने ‘मखरेवाडी रस्ता कोठे आहे?’, असे तिला विचारले. तेवढ्यात चालकाच्या पाठीमागे बसलेल्या तरुणाने गुंगीचा फवारा मारून तिला गाडीत ओढले तिला अज्ञातस्थळी नेले. त्यानंतर काय घडले याबाबत ती सांगत नाही.

शुद्धीत आल्यानंतर आपण पांढरीपूल येथे असल्याचे तिला इतरांकडून समजले. तिने भावाशी संपर्क साधल्यानंतर तिला सोमवारी रात्री घरी नेण्यात आले. अपहरणकर्ते कोण होते हे अपहरण का केले, यासंबंधी तिला काहीच सांगता येत नाही. मुलीवर अत्याचार झाल्याचा पोलिसांना संशय आहे, पण तसे झाले नसल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. श्रीगोंदे पोलिसांंनी चार अज्ञात तरुणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबीयांनी अत्याचार झाल्याचे नाकारले, तरी पोलिस तिची तपासणी करणार आहेत.

सुव्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभे
ज्या ठिकाणाहून हे अपहरण घडल्याचे सांगितले गेले, तो बाह्यवळण रस्ता कायम गजबजलेला असतो. सोमवारी आठवडे बाजारामुळे तेथे वर्दळ अधिक होती. असे असताना दिवसाढवळ्या अपहरण झाल्याने पुन्हा एकदा यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पीडित मुलीचा वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यावर या प्रकरणात आणखी वाढीव कलमे लावले जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तिला मंगळवारी नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणले जाणार होते, मात्र तसे झाले नाही. जिल्हा रुग्णालयात चौकशी केली असता, डॉक्टरांनी तिला श्रीगोंद्यातून येथे आणले जाणार असल्याचा निरोप होता. पण, आणण्यात आले नसल्याचे सांगितले. तिची तपासणी श्रीगोंद्यातच झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समजली. तिच्या हातावर इंजेक्शन दिल्याच्या दोन खुणा आहेत. एकीकडे मुलगी तपासात सहकार्य करत नाही दुसरीकडे तिच्या हातावर इंजेक्शनच्या खुणा यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.

काळ्या स्कॉर्पिओचा शोध जारी
अपहरण प्रकरणात वापरलेली स्कॉर्पिओ ही काळ्या रंगाची असून, त्यावरील ७५०३ एवढाच क्रमांक पीडित मुलगी सांगते. त्यावरून आता पोलिस या स्कॉर्पिओचा शोध घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...