आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anuradha Thakur News In Marathi, Painter, Divya Marathi, International Art Festivel

ठाकूर यांच्या ‘अनुभूतीच्या स्पंदनरेखा’ येणार इंग्रजीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - येथील प्रसिद्ध चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या ‘अनुभूतीच्या स्पंदनरेखा’ या पुस्तकाचा ‘स्केचेस ऑफ र्‍िहदमिक एक्सपिरियन्सेस’ हा इंग्रजी अनुवाद जयपूर येथील इंटरनॅशनल आर्ट फेस्टिव्हलमध्ये प्रकाशित होणार आहे. फेस्टिव्हलच्या मुख्य प्रवर्तक राजस्थानच्या सांस्कृतिक विभागाच्या आयुक्त किरण सोनिगुप्ता असून त्यांनी ठाकूर यांना या महोत्सवाचे विशेष निमंत्रण दिले असून उद्घाटन सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात 19 मार्चला सायंकाळी पाच वाजता पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
‘अनुभूतीच्या स्पंदनरेखा’ हे पुस्तक म्हणजे अनुराधा ठाकूर यांच्या कलात्मक अभिव्यक्तीचे संकलन आहे. लेखन ही त्यांच्या कलात्मकतेची दुसरी मिती आहे. जीवनातील वेगवेगळ्या छटा या वेगवेगळ्या भूमिकेतून व्यक्त करताना जीवनाच्या कोपर्‍यातील अंधारही रंगांच्या वेगवेगळ्या छटांनी त्यांची प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे. कलेच्या माध्यमातून समाजघटकांसाठी केलेले प्रयोग, नाकारलेल्यांना संघर्ष करण्याची किंवा लढा देण्याची उभारी सहजसुंदर शब्दांमधून व्यक्त झाली आहे. या पुस्तकाला संगमनेर येथील कवी अनंत फंदी पुरस्कार, वारणेचा वाघ पुरस्कार, बडोदा येथील अभिरुची गौरव पुरस्कार आणि डॉ. बी. पी. हिवाळे ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.
सहज सोपी भाषा
हा अनुवाद अहमदनगर महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका आशिता रिचर्ड्स डिसुझा यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर करताना एका वेगळ्या आनंदाची अनुभूती मला मिळाली. यातील संस्कृतिदर्शक शब्द इंग्रजी भाषेत पकडणे अवघड असूनही मुळातील सहज सोप्या भाषेमुळे इंग्रजी अनुवादही प्रवाही झाला. त्याचे जगभरातील वाचक स्वागत करतील.