आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील प्रदर्शनात नगरच्या अनुराधा ठाकूर यांची चित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारतीय संस्कृतीचे बारकावे रेखाटणाऱ्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या चित्रांचे प्रदर्शन अमेरिकेत होत आहे. नवव्या अॅन्युअल "शिकागो गाला' व बोस्टन येथील आठव्या अॅन्युअल "न्यू इंग्लंड गाला' प्रदर्शनात त्यांच्या चित्रांना स्थान मिळाले आहे. एशियन आर्ट गॅलरीकडून या प्रदर्शनांचे आयोजन अमेरिकेतील दोन शहरांमध्ये करण्यात आले आहे.
अमेरिकन आर्ट अवॉर्डमध्ये ठाकूर यांच्या "रिदम ऑफ द सिझन्स - १५' या चित्राला तिसरे, तर "सेरेन हार्मनी - ४७' या चित्राला विभागून चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या जागतिक चित्रस्पर्धेत ५१ देशांतील चित्रकारांनी भाग घेतला. अमेरिकेतील अग्रगण्य २५ आर्ट गॅलरी स्पर्धेच्या परीक्षण समितीत होत्या. अमेरिकन आर्ट अवॉर्डचे प्रेसिडेंट तथा हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते थॉम बिऱ्ड्झ यांनी इंटरनेटवर ठाकूर यांची चित्रे पाहून त्यांना ई-मेलद्वारे चित्र पाठवून स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली. स्पर्धेतील विजेत्या चित्रकारांबाबत "हायलाइट हॉलिवूड' या दैनिकातून माहिती देण्यात आली.
इंडियन अॅकॅडमी ऑफ फाइन आर्टस्तर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील चित्रप्रदर्शनात ठाकूर यांच्या "एथनिक सेरनडीपीटी-१६' व "एथनिक सेरनडीपीटी-१७' या दोन चित्रांची निवड झाली आहे. त्यांच्या "अनुभूतींच्या स्पंदनरेखा' या पुस्तकास अंकुर मराठी साहित्य संमेलनात ललित विभागातून राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे. या पुस्तकाला आतापर्यंत पाच पुरस्कार मिळाले आहेत.