आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादा कोंडके चित्रपट महोत्सवासाठी स्थानिक कलावंतांना आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नगरी सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २४ मे या कालावधीत शाहीर दादा कोंडके चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील लोक कलावंत स्थानिक नाट्य कलावंतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन समितीचे अध्यक्ष उमेश घेवरीकर यांनी केले.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सकाळी ते १२ सायंकाळी ते या कालावधीत महेश चित्रमंदिरात लोककलांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये वासुदेव, गोंधळी, पिंगळा, बहुरुपी, शाहिरी, लोकगीत, लावणी, बतावणी, जागरण गोंधळ, स्मशानजोगी, भारूड अशा विविध लोककला सादर केल्या जातील. स्थानिक नाट्य कलावंतांचे एकपात्री, प्रहसन, मिमिक्री, पथनाट्य, चर्मवाद्य, तंतुवाद्य, तसेच नृत्य सादरीकरण होणार आहे.
या महोत्सवात जिल्हा शहरातील कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलावंतांनी आपली नावे १५ मेपर्यंत समन्वयक भगवान राऊत, सांस्कृतिक कार्यक्रमप्रमुख उमेश घेवरीकर यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष अंबादास नरसाळे कार्याध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...