आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्तच्या कामात कुचराई केल्यास कारवाई : पंकजा मुंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जलयुक्तशिवार अभियानाच्या कामात कुचराई केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी दिला. कृषी विभागाच्या आढावा बैठकीसाठी आल्या असता मुंडे यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. जलयुक्त अभियानाच्या कामात काही विभाग मागे पडले असून, त्यांची चौकशी करुन कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात जलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ होत आहे. जलयुक्तचे राज्यात चांगले काम आहे. तथापि, काही विभागांचे काम कमी आहे. अशा विभागांची चौकशी करण्यात येईल, असे मंुडे म्हणाल्या.
अभियानाचे श्रेय घेण्यावरुन वाद सुरु आहे का, असा प्रश्न विचारला असता मंुडे म्हणाल्या, ही योजना सरकारची आहे. जनता, स्वयंसेवी संस्था अशा सर्वांचाच यात सहभाग आहे. त्यामुळे श्रेयावरुन कुठलाच वाद नाही. येत्या पावसाळ्यात जलयुक्तचे चांगले परिणाम पहावयास मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तारात आणखी काही खात्यांची जबाबदारी आपल्याला मिळणार का, या प्रश्नावर मुंडे म्हणाल्या, मी कुठलेही खाते मागितले नव्हते आणि मागणार नाही. मी आहे त्या खात्यातच चांगले काम करु इच्छित अाहे. डॉ. बालाजी तांबे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल विचारले असता, मी काही आयुर्वेद तज्ज्ञ नाही. त्यामुळे यावर मी काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.