आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य बॉक्सिंग स्पर्धेत नगरच्य आरतीला सुवर्णपदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ठाणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नगरच्या आरती रिमान भोसले हिने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत तिने 75 किलो वजनगटात कोल्हापूरची खेळाडू अंजली धाडगे हिला अवघ्या 10 सेकंदात नॉकआऊट केले. आरतीने आतापर्यंत राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पाच सुवर्णपदके व बेस्ट बॉक्सर पुरस्कार मिळवला आहे.

राष्‍ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही तिने एक सुवर्णपदक मिळवले आहे. आरती पेमराज सारडा महाविद्यालयात शिक्षण घेत असून सध्या ती मध्यप्रदेशात भोपाळ येथे साई भारतीय क्रीडा प्राधिकरणात आंतरराष्‍ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिरात प्रशिक्षण घेत आहे. तिला जिल्हा पोलिस दलाचे बॉक्सिंग प्रशिक्षक शकील अहमद शेख, मदन पुरोहित, प्रा. संजय धोपावकर यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव गफ्फार शेख, नगरसेवक धनंजय जाधव यांनी तिचे अभिनंदन केले.