आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटांमध्ये सशस्त्र मारामारी, केडगावमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - न्यायालयातील दावा मागे घेण्यावरुन दोन गटांत गज, विटा, मिरची पावडर, लाकडी दांडके वापरून लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाली. यात दोनजण जखमी झाले. ही घटना केडगावमधील लालानगर येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 

सिराज सिकंदर सय्यद (लालानगर) यांच्या घरी सलिम हनिफ शेख, फिरोज हनिफ शेख, जावेद हनिफ शेख, अन्वर हनिफ शेख (सर्व केडगाव) हे गेले. तुमच्या मुलीने कोपरगावच्या न्यायालयात दाखल केलेला पोटगीचा दावा काढून घ्या, असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडके लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात सिराज शेख जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण हंडाळ करत आहेत. 

दरम्यान, याप्रकरणी दुसरी फिर्याद जावेद हमीद शेख यांनी दिली आहे. सिराज सिकंदर सय्यद, मेहमुदा सिराज सय्यद, मेहमूद अहमद पठाण, कलिमा आदम पटेल हे जावेद शेख यांच्या घरी गेले असता तेथे त्यांच्यात वाद झाले. चौघांनी जावेदच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून गज-विटाने मारहाण केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी घरात घुसून मारहाण करणे, धमकावणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यांचा तपास पोलिस नाईक राठोड करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...