आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींच्या हाकेला आर्मर्ड कोअरची साद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियानाचा श्रीगणेशा करण्याचा संकल्प केला आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनाही त्यांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलच्या (एसीसीएस) रेकॉर्ड विभागाच्या वतीने भुईकोट किल्ला व डीएसपी चौकात स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करताना कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल जगतसिंग तन्वर म्हणाले, देशाच्या संरक्षणात आघाडीवर असलेली भारतीय सेना स्वच्छ भारत अभियानातही आघाडीवरच राहिल, हे भारतीय सेनेने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियान राबवण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन भारतीयांच्या आरोग्य रक्षणास उपयुक्त ठरणार आहे. स्वच्छता हे पावित्र्याचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. स्वच्छतेमुळे मन प्रसन्न होते. प्रसन्न मनाने केलेले कार्य यशोशिखरावर पोहोचण्यास मदत करते. पंतप्रधानांच्या प्रत्येक अभियानात भारतीय सेना सहभागी होऊन त्यांना साथ देईल, असेही तन्वर यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आर्मर्ड कोअर रेकॉर्डमधील अधिकारी, जवान, असैनिक कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी हाती झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन भुईकोट किल्ला आणि डीएसपी चौक परिसराची साफसफाई केली. मेजर राजेंद्र बोरुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मेजर मशुर थापा यांनी आभार मानले. हे स्वच्छता अभियान अखंडपणे कार्यरत ठेवण्याचा संकल्पही भारतीय सेनेने यावेळी केला.