नगर - लष्कराच्या सदर्न कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल अशोक सिंह (परम विशिष्ट सेवा पदक अति विशिष्ट सेवा पदक) यांनी बुधवारी नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल (एसीसीएस) मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला (एमआयआरसी) भेट देऊन तेथील प्रशिक्षण सुविधांची पाहणी केली.
एसीसीएस एमआयआरसी ही देशातील अग्रगण्य लष्करी प्रशिक्षण केंद्रे आहेत. अशोक सिंह यांनी तेथील आधुनिक प्रशिक्षण सुविधांबरोबरच लष्कराच्या येथील केंद्राच्या कार्यक्षमतेचीही तपासणी केली. या दोन्ही केंद्रांची लष्करी सिद्धता एखाद्या मोहिमेसाठी युद्धसज्जता यांची तपासणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षण सुविधा जवानांच्या कुटुंब कल्याणाशी संबंधित बाबींवर चर्चा केली. अलीकडील काळात सदर्न कमांडने याबाबत पावले उचलल्याने जवान त्यांच्या कुटुंबीयांच्या राहण्याच्या सुविधांमध्ये मोठ्या सुधारणा झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कुटुंबासह किंवा कुटुंबाशिवाय राहणाऱ्या जवानांच्या निवासस्थानांचा दर्जा अतिशय चांगला, जवानांच्या मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा, तसेच निवृत्त सैनिक त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. उच्च दर्जाचे प्रशिक्षण सैनिकांच्या सुविधांबद्दल अशोक सिंह यांनी समाधान व्यक्त करत
आपले काम अधिक उत्कृष्ट करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, असे आवाहन सर्व संबंधितांना केले.
लष्कराच्या सदर्न कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल अशोक सिंह यांनी बुधवारी नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलला (एसीसीएस) भेट देऊन तेथील आधुनिक प्रशिक्षण सुविधांची पाहणी केली. (उजवीकडे) एमआयआरसीमधील शस्रागाराची पाहणी करून परतताना अशोक सिंह.