आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपाली दरेकरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना पकडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - रुपाली भाऊसाहेब दरेकर हित्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसे लेखी निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिले आहे. २१ मार्चला रुपालीचा दशक्रिया विधी आहे. त्या दिवसापर्यंत आरोपींना अटक झाली नाही, तर मंगळवारपासून अांदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

रुईछत्तीशी येथील रुपाली भाऊसाहेब दरेकर या विवाहितेच्या पोटात विषारी औषध गेल्यामुळे तिचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. नंतर रुपाली हिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन रुपालीचा नवरा, सासरा, सासू दीर यांच्याविरुद्ध रुपालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस करीत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी रुईछत्तीशी येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची भेट घेतली. त्यांना लेखी निवेदन देत ग्रामस्थंानी रुपालीचा खून झाल्याचा संशयही व्यक्त केला आहे. याप्रकरणातील अारोपींना लवकरात पकडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी रविंद्र धाडे, सागर गोरे, राहुल गोरे, संदीप गोरे, संतोष गोरे, किरण भापकर, विशाल भांबरे, मंगेश मुटकुले, विलास भांबरे, ईश्वर कुटे, अभिजीत सपाटे, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...