आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दशकांपासून कलाशिक्षक देतोय दगडांना सौंदर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - निराकार दगडांची शकले उडवून त्यातील सौंदर्य जगासमोर आणणारे शिल्पकार आपण पाहतो. पण याच दगडांच्या नैसर्गिक, निविर्कार आकारातील सौंदर्य शोधण्याची दृष्टी असणारे कलाकार दुर्मिळच. अनिल राऊत नावाचा असाच एक अवलिया गेल्या ३० वर्षांपासून श्रीरामपुरात निर्जीव दगडांना जिवंत करण्याचे काम करीत आहे.

चेहरा नसलेल्या आकारहीन, निर्जिव दगडांना बारकाईने पाहिल्यास त्यात अनेक सजीव आकार सापडतात. ३० वर्षांपूर्वी कलाशिक्षक राऊत यांना याचा बोध झाला. तेव्हापासून यांच्यातील कलाकारास स्वस्थ बसवेना. नदी, नाले, रस्ते, मैदान सापडेल तेथे दगडांचा शोध सुरू झाला. आजपर्यंत हजारो दगड जमवले. त्यांच्या नैसर्गिक रचनेत हस्तक्षेप करता एकापेक्षा अनेक दगडांना चिटकवून त्यातून सजिवांच्या शंभरहून शिल्पकृती त्यांनी तयार केल्या आहेत.
राऊत सध्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात कार्यरत आहेत. या छंदाची माहिती आता अनेकांना झाल्याने वेगळ्या आकाराचा दगड दिसताच तो राऊत यांना भेट केला जातो. दगडांचा खच घरात होऊ लागल्याने त्यांच्या दगड प्रेमास अपेक्षेप्रमाणे घरातून विरोध झाला. मात्र त्यातील सौंदर्यपाहून आता कुटुंबातील सदस्यही या दगडांच्या प्रेमात पडले आहेत.

दीड सेंटीमीटर पासून १५ सेंटीमीटरपर्यंतच्या आकाराची सुमारे दीडशे दगडी कलाकृती आता प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. यात आई मुलाच्याच्या शिल्पाची अनेकांनी वाहवा केली. याशिवाय लिबर्टी, एलियन, बिगुलवादक, विविध प्रणी प्राणी, पक्षी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक आकारांबरोबरच नैसर्गिक रंगांचा वापर करूनच शिल्प तयार करण्यावर राऊत यांचा भर असतो. केवळ चिटकवण्यसाठी नैसर्गिक पर्याय उपलब्ध झाल्याने रासायनिक द्रव्याचा वापर करावा लागतो. मात्र राऊत शिल्पातील प्रतिमा इतकी अचूकपणे हेरतात की, हे शिल्प पाहताच क्षणी लक्ष वेधून घेतात.

अिनल राऊत यांनी तयार केलेल्या कलाकृती. दीड सेंटीमीटरपासून १५ सेंटीमीटरपर्यंतच्या आकाराची सुमारे दीडशे दगडी कलाकृती प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.
अनिल राऊत

लिम्का बुक ऑफ वर्ल्डने नोंद घ्यावी
प्रत्येकदगडामध्ये जीवन दडलेले आहे. ते शोधण्याचा मी नेहमी प्रयत्न करीत असतो. दगडामध्ये आकार सापडला की होणारा आनंद अवर्ननिय आहे. मी केलेल्या कलाकृतींची संख्या पाहता लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घ्यावी, अशी इच्छा आहे. भविष्यामध्ये मोठ्या दगडापासून शिल्प तयार करण्याचा मानस आहे.'' अनिलराऊत, कला शिक्षक.