आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगडाच्या भूमिकेमुळे पंकजा मुंडे यांच्यासमोर आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री महाराज यांच्या नव्या भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपसह वंजारी समाजात उलटसुलट चर्चा सुरू असून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यापुढे वेगळेच आव्हान उभे राहिले आहे. आगामी काळात पंकजा यांना सामाजिक नेतृत्वासाठी अधिक संघर्ष करण्याची तयार ठेवावी लागेल. महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी गडावर राजकीय नेत्यांच्या सभा, संमेलने, तसेच भाषणबाजीला प्रतिबंध करण्याचा ठराव विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजूर करून गडाच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली. गेल्या २५ वर्षांपासून गड म्हणजे गोपीनाथ मुंडे मुंडे म्हणजे भगवानगड असे समीकरण दृढ झाले होते. संत भगवानबाबांच्या फोटोबरोबर मुंडे यांचे एकत्रित फोटो विक्रीचा उच्चांक बघितल्यावर वंजारी समाजाने त्यांना दैवताचे स्थान दिले. राज्यात सुमारे २० लाखांच्या आसपास वंजारी समाजाची लोकसंख्या असून या समाजाचे श्रद्धास्थान म्हणून भगवानगडाचे लाँचिंग गोपीनाथ मुंडे यांनी केले. माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्यानंतर वंजारी समाजाचे एकमुखी नेतृत्व म्हणून मुंडे यांची ओळख झाली. राज्यातील प्रस्थापितांवर दबाव वाढवण्यासाठी ओबीसी कार्डची योजना गडावरूनच अमलात अाणून मास लीडर म्हणून गोपिनाथ मुंडे यांनी मान्यता मिळवली. युती शासनाच्या काळात सत्तेच्या माध्यमातून अनेकांना गड सर करायला भाग पाडत राज्याच्या अलिकडच्या काळात देशाच्या राजकीय वर्तुळात गडाची ओळख करून दिली.

भगवानगडाची ताकद ओळखून मतांच्या संख्येमुळे पक्षश्रेष्ठीसुद्धा मुंडे यांना नेता म्हणण्यास तयार झाले. भाजपचे सामूहिक नेतृत्वाचे सूत्र व्यक्तींपर्यंत खाली येण्यास भगवानगडाच्या शक्तीचा उपयोग मुंडे यांना झाला. बारा वर्षांपूर्वी महंत भीमसिंह महाराजांच्या निधनानंतर डॉ. नामदेवशास्त्रींना गादीवर बसवून त्यांच्या स्टाइलने मंुडे यांनी भव्य प्रमाणात पदग्रहण सोहळा घडवून आणला. शास्त्रींनी गडाचे मैदान मुंडे यांना सदैव खुले ठेवल्याने मुंडे यांच्या नेतृत्वाशी सहमत असलेल्यांनाच व्यासपीठावर सन्मान मिळे. मुंडे यांचे समाजासह ऊस तोडणी कामगारांबाबत धोरण संघटनाबाबत भगवानगडावरचे भाषण म्हणजे त्यांच्या समर्थकांना पर्वणी ठरे. दसऱ्याच्या दिवशी लाखो लोक भगवानगडावर जमवण्याची किमया मुंडे यांनी साधली. मुंडे यांच्या निधनानंतर गडावर त्यांचे स्मारक व्हावे, असा त्यांच्या समर्थकांच्या प्रयत्न होता. भगवानबाबा वगळता गडावर अन्य गोष्टींना थारा नको, असा मतप्रवाह त्यावेळी होता. पंकजा यांनी त्यांचे स्वतंत्र स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. गड हा शब्द मुंडेंना श्रद्धेचा असल्याने पंकजा यांनी परळीच्या स्मारकाला गोपीनाथ गड असे नाव जाहीर केल्यानंतर मुंडे महंतांमध्ये मानसिक दुरावा सुरू झाला. भगवानगडाला शह देण्यासाठी गोपीनाथ गड असा समज गडावर श्रद्धा बाळगणाऱ्या भाविकांनी करून तसा प्रचार सुरू झाला. पंकजांना या गोष्टींचे गांभीर्य कळू देण्याची चूक त्यांच्या निकटवर्तीयांनी जाणूनबुजून केल्याने वितुष्ट वाढत गेले. गडाला आपल्या पाठिशी गृहित धरण्याचा विचार पंकजांना गाफील ठेवण्यात आला. समाज संघटन, गडाची गर्दी, लोकप्रियतेचे समाजातील वलय यासाठी फारशी धावपळ करावी लागल्याने माणसे जोडण्याचे मुंडे यांचे मंत्र पंकजा यांनी पेटीत बंद केले. महंतांविरुद्ध आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल होऊनही त्याची फारशी दखल पंकजाकडून घेतली गेल्याने खंत महाराजांनी बोलून दाखवली. ही पंकजांची चूक ठरली. मुंडे यांच्या गृहकलहात भगवानगडाचे भाविक पंकजा यांच्या पाठिशी उभे रहात. धनंजय मुंडे यांच्या वाहनावर दगडफेक केली. त्याचा राग म्हणून धनंजय यांच्या समर्थकांनी महंतांचे पुतळे जाळले. गडावर मुंडेंचे भाषण चालू असतानाच चार वर्षांपूर्वी एकाने स्वत:ला पेटून घेतले, तोसुद्धा राग महंतांवर निघाला. अशी विविध घुसमट वाढून पंकजा यांचा संवाद कमी झाला. एकाकी पडत चालण्याची भगवानगडाची भावना व्यक्त होण्याचा मुहूर्त महंतांनी साधून गोपीनाथगड लोकार्पण सोहळ्यात खोचक भाषण करून पंकजांना जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंकजा महाराजांचे दूरध्वनीवरून संभाषण झाले. पण नाराजी कायम राहिली. आता कुणाचे छत्र नको, स्वत:ची ओळख निर्माण करण्याची गडाची धडपड सुरू होऊन सभाबंदीचा निर्णय जाहीर झाला. या निर्णयाने अपेक्षित प्रतिसाद समाजात तीव्रतेने उमटले. काहिसा अंतर्गत तणाव वाढला. समाज विघटित करण्याचे षडयंत्र राजकारण्यांनी यशस्वी करून दाखवले, येथपासून ते पंकजा यांना गोपीनाथ गड भोवला अशी चर्चा झाली. भगवानगडाची संघशक्ती क्षीण झाली की, ओबीसी आघाडी क्षीण होऊ शकते याचा विचार कुठेही झाला नाही, अशी खंत समाजातून व्यक्त होत आहे. महंतांनी असा निर्णय घेण्यापूर्वीच आवश्यक त्या सर्व घटकांशी विचार वििनमय करून अत्यंत मुत्सदीपणाने घोषणा करून वंजारी समाजाच्या भावनिक उद्रेक रोखण्याचा प्रयत्न केला. पंकजांनाच नव्हे, तर कुणालाही येण्याला बंदी नाही. भाजप अंतर्गत पंकजा विरोधी गटसुद्धा पंकजा यांना अडचणीत आणण्यासाठी गडावर अस्तित्व दाखवून वेगळा प्रकार रोखू शकेल, अशी यंत्रणा गडावर नाही.
पुढे वाचा... भगवान गडाने भाषणबंदीचा केलेला फतवा मागे घ्यावा म्हणून
बातम्या आणखी आहेत...