आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदीचा निर्णय काँग्रेसमधील मरगळ हटवणार का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भाजपची सत्ता आल्यापासून शहर जिल्हा काँग्रेसमध्ये आलेली मरगळ आता नोटाबंदीनंतर हटणार आहे. गेल्या दोन वर्षांत प्रथमच काँग्रेस नोटाबंदीच्या मुद्द्यावर सोमवारी (२८ नोव्हेंबर) जनआक्रोश आंदोलन करणार आहे. आंदोलनाच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे पक्षातील कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करतील? अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्यामुळे अाता भाजपने त्यात उडी घेऊन नोटाबंदीच्या समर्थनार्थ सोमवारीच मोटारसायकल रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून विरोधी पक्ष म्हणून राज्यात काम करणाऱ्या काँग्रेसला स्वत:च्या जिल्ह्यात सक्षमपणे काम करता आले नाही. गेल्या दोन वर्षांत केवळ जयंत्या, पुण्यतिथीनिमित्त एकत्र येणाऱ्या काँग्रेस जनाला आता नोटाबंदीने मोठा आधार दिला अाहे. सत्तेत असताना नेहमी नाके मुरडून घेणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे या आंदोलनानिमित्त एकत्र येण्याची शक्यता असली, तरी ते एकत्र येतील की नाही याबाबत काँग्रेसमध्येच संभ्रम आहे. गेल्या दोन वर्षांत काँग्रेसला किरकोळ स्वरूपाचे आंदोलन वगळता कुठलेही मोठी आंदोलने जिल्ह्यात उभारता आली नाही. त्यामुळे आता नोटाबंदीच्या मुद्द्यावर काँग्रेसने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या आर्थिक अराजकतेच्या विरोधात नगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी दिली. कुठलीही पूर्वतयारी पर्यायी व्यवस्था करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक हजार पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. असे चव्हाण यांनी सांगितले.दरम्यान, भाजपने नोटाबंदी समर्थनार्थ मोटारसायकल रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे महानगराध्यक्ष खासदार दिलीप गांधी म्हणाले, नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय आहे. नोटाबंदीच्या समर्थनार्थ भाजपतर्फे शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे, असे गांधी यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेेते विखे यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर तालुक्यातील थोरात यांचे गाव असलेल्या जोर्वे गावात बुधवारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नावाचा लावण्यात आलेला फ्लेक्स थोरात गटाने फाडला होता. त्यामुळे विखे-थोरातांमधील दरी वाढली आहे. आता सोमवारचे आंदोलन हे थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याने विखे उपस्थित राहतात की नाही? यावर सध्या चर्चा सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...