आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पास प्रकरणी एसटी महामंडळाकडून २०० जणांवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - एसटी महामंडाळातर्फे ज्येष्ठ नागरिक अन्य सवलतीच्या पासधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी मोहीम विविध मार्गांवर सुरू झाली आहे. अत्यंत कडक निकषांमुळे सवलतीच्या योजना अघोषित बंद करण्यात आल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.

शनिवारी दुपारपर्यंत पाथर्डी आगाराच्या तपासणी पथकाने दोनशेहून अधिक बोगस पासधारकांना पकडून त्यांचे कार्ड कारवाईसाठी पोलिसांकडे जमा केले. महत्त्वाच्या थांब्यावर तपासणी पथक पासधारकांची पडताळणी करत आहे. पासधारकांच्या पात्रतेविषयी संशय आल्यास आधार िकंवा मतदान कार्ड मागून वाहकाकडून सवलतीचे तिकीट नाकारले जाते. तसे आदेश आगारप्रमुखांनी िदले. अपंग, कर्णबधिर, ज्येष्ठ नागरिक आदी सवलतीची कार्डे किंवा व्यक्त संशयास्पद वाटल्यास पूर्ण तिकीट मागितले जाते. वैद्यकीय अधिकारी, महसूल विभागाच्या िशफारशीला केराची टोपली दाखवत वाहक पूर्ण तिकीट मागतात; अथवा पैसे देण्यास नकार देणाऱ्याला मध्येच उतरले जाते. ज्येष्ठांच्या पाससाठीही कार्डधारक ज्येष्ठ वाटल्यास पूर्ण तिकीट घेण्याचे आदेशही देण्यात आल्याने पास कशासाठी असा प्रश्न पुढे आला आहे. बनावट पासधारकांविरुद्ध कारवाई करण्यास पोलिसांना रस नाही. चौकशीसाठी वैद्यकीय अधिकारी महसूल अधिकाऱ्याला पाचारण करून पासधारक अपात्र सापडल्यास संबंधित अधिकारीही आरोपी म्हणून गणला जाणार आहे. काही ठिकाणी महसूल पोलिस अधिकाऱ्यांचे बनावट पास वाटणारी टोळी कार्यरत आहे.

आतापर्यंत २१० जणांकडून बनावट पास जप्त
-वरिष्ठांच्याआदेशाने बनावट अपात्र पास शोधून कारवाई मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्यांचे २१० लोकांचे बनावट पास जप्त करून पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले. पात्र पासधारकांना सवलत दिली जाते. पास देण्याचे धोरण बदलेल की नाही याची माहिती नाही.'' दिलीपपठारे, आगारप्रमुख,पाथर्डी.