आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या स्टुडिओचे उद्घाटन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-आदिवासींचे उत्सव, नृत्ये, आभूषणे, वस्त्रप्रावरणे हे सगळं चित्रबद्ध करणार्‍या चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या स्टुडिओचे उद्घाटन रविवारी झाले. नगरचे आएएस सुपुत्र आणि सध्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे स्वीय सचिव असलेले नीळकंठ आव्हाड, त्यांची पत्नी प्राजक्ता, साहित्यिक डॉ. अरुण मांडे, प्रा. नीलिमा बंडेलू, तसेच ठाकूर कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

धर्माधिकारी मळ्यातील रिया आकांक्षामध्ये हा स्टुडिओ आहे. अनुराधा यांच्या कलाकृतींनी तो सजला आहे. 1981 पासून त्यांनी आदिवासींच्या जीवनावरील चित्रे काढायला सुरुवात केली. प्रारंभी भंडारदरा भागातील वनवासींची कृष्णधवल चित्रे त्यांनी रेखाटली. नंतर देशाच्या विविध आदिवासी प्रांताना भेट देऊन, त्यांचे उत्सव, परंपरा, चालीरिती जाणून घेत अनुराधा यांनी ते कॅनव्हासवर उतरवले. गडचिरोली, कच्छ, राजस्थान, झाबुआ, तसेच ईशान्य भारतातील आदिवासी जीवनावर त्यांनी चितारलेल्या चित्रमालिका गाजल्या. या चित्रांची प्रदर्शने पुणे, मुंबई, नवी दिल्ली, जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, चंडीगड येथे झाले. या सर्व प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळाला.

अनेक पंचतारांकित हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये त्यांची चित्रे झळकत आहेत. क्राय कंपनीने त्यांची चित्रे असलेले कॅलेंडर व भेटकार्ड सन 2012 मध्ये प्रकाशित केले. सीएफएम कॅलेंडरच्या पहिल्या पानावर अन्य 11 जागतिक कीर्तीच्या चित्रकारांबरोबर झळकण्याचा मानही अनुराधा ठाकूर यांना मिळाला आहे.