आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Jagtap Order To Mayor To Start Development Work At Ahamdnagar

प्रलंबित कामांना गती देण्याचे आमदार जगताप यांचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पिण्याच्या पाण्याच्या योजना व नगरोत्थानमधील कामांसह सावेडीतील नाट्यगृहाच्या कामाला गती देण्याचे आदेश आमदार अरुण जगताप यांनी गुरूवारी महापालिका अधिकार्‍यांना दिले.
नगरमधील प्रलंबित योजनांबाबत महापौर संग्राम जगताप यांनी ही बैठक बोलावली होती. याप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. उपमहापौर सुवर्णा कोतकर, आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त महेश डोईफोडे, राष्ट्रवादीचे गटनेते समद खान, नगरसेवक सुनील कोतकर, सविता कराळे, आरिफ शेख, जितू गंभीर, शहर अभियंता नंदकुमार मगर, यंत्र अभियंता परिमल निकम आदी यावेळी उपस्थित होते.
मूलभूत सोयी-सुविधांची कामे, केडगाव पाणी पुरवठा फेज 1, शहर पाणी पुरवठा योजना फेज 2, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान, घरकुल योजना, भुयारी गटार योजना, सावेडी येथील नाट्यगृह, घनकचरा व्यवस्थापन आदी कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
जगताप म्हणाले, शहर पाणी पुरवठा योजना फेज 2 नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेत महापालिकेच्या हद्दीत पाइप टाकण्याचे काम प्रलंबित आहे. ते मार्गी लावण्यासाठी तांत्रिक अधिकार्‍यांची (अभियंता) संख्या वाढवून काम जलद गतीने पूर्ण करावे. या योजनेसाठी बांधकाम, तसेच महावितरण अंतर्गत कामांसाठी आवश्यक निधीची मागणी पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याकडे करण्यात येईल. केडगाव पाणी पुरवठा योजनेतील उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे आदेश जगताप यांनी दिले. टॉपअप पेट्रोलपंप कोपरा ते फकिरवाडापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश काढावा, गोविंदपुरा ते भिंगारनाल्यापर्यंत गटार बांधण्याचे काम व सावेडी नाट्यगृहाच्या कामाला गती द्यावी, असा आदेश बैठकीत देण्यात आला.