आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांच्या डोक्यात फक्त सत्ता : अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अरविंद केजरीवाल यांच्या हातात मी 17 मुद्दय़ांचे पत्र दिले होते. त्यासाठी राजी असाल, तर ममता बॅनर्जींप्रमाणे तुम्हालाही पाठिंबा देण्यास तयार आहे, असे त्यांना सांगितले होते. मात्र, अद्याप त्यांनी काहीही प्रतिसाद दिलेला नाही. देशापेक्षा ते सत्तेचा विचार अधिक करत आहेत, असे टीकास्त्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोडले. फक्त सत्तेमधून देशाला उज्ज्वल भविष्य मिळू शकणार नाही, असे वाटते. त्यामुळे सत्तेच्या मागे धावणारे इतर पक्ष आणि केजरीवाल यांच्यात फरक राहणार नाही, असेही अण्णांनी स्पष्ट केले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पाठिंबा का दिला, याचे स्पष्टीकरण अण्णांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले. ममता व त्यांचा पक्ष आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. आम्हा दोघांनाही देशाबद्दल तळमळ असल्याने मी त्यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला. बदल घडवण्यासाठी आम्ही सर्व पक्षांना 17 मुद्दय़ांचे पत्र देऊन अंमलबजावणीस तयार आहात का? असे विचारले होते. पण कुणीच आम्हाला उत्तर दिले नाही. ममतांनी मात्र सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.