आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढीच्या तीन पूजा स्वतंत्र; पण दीड तासच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-अधिकाधिक वारकऱ्यांना दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने पाद्यपूजा, नित्यपूजा , महापूजा एकत्र करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र याबाबत विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यामध्ये शासनाने दिलेल्या आदेशानुसार तीनही पूजा स्वतंत्रपणे करण्यात येणार आहेत. पूजा करण्याच्या वेळांमध्ये बदल केला असून सर्व पूजेचा कालावधी दीड तासाचा असणार आहे.
मंदिर समितीने केलेल्या नियोजनाप्रमाणे १२.३० वाजता मंदिर बंद करण्यात येणार होते आणि सर्व पूजा २.१० वाजता संपून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार होते. आता मंदिर २७ जुलैच्या रात्री १.३० वाजता बंद करण्यात येईल. सर्व पूजा वाजता पूर्ण होऊन भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुंढे यांनी सांगितले. यापूर्वी मंदिर १२.३० ते पहाटे वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत होते, आता शासन आदेशानुसार पाद्यपूजा, नित्यपूजा महापूजा स्वतंत्रपणे करण्यात येत असल्या तरी कालावधी मात्र दीड तासाचाच राहणार आहे.

असे आहे नियोजन...
१.३०वाजता मंदिर बंद. १.४५ वाजेपर्यंत मंदिर गाभारा स्वच्छता, १.४५ ते १.५५ मंदिर समितीच्या वतीने पाद्यपूजा, १.५५ ते २.२० मंदिर समितीच्या वतीने नित्यपूजा, २.२१ ते २.४० मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा, २.४१ ते ३.०० वाजेपर्यंत रुक्मिणीची महापूजा. ३.०० वाजता दर्शनासाठी मंदिर खुले.